मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या सहा जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपने गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासमोर काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मैदानात उतरवलं आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.
उत्तर मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा ४,४६,५८२ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार | पक्ष | मिळालेली मतं |
गोपाळ शेट्टी | भाजप | ६,६४,००४ |
संजय निरुपम | काँग्रेस | २,१७,४२२ |
सतीश जैन | आप | ३२,३६४ |
नोटा | ८,७५८ | |
कमलेश यादव | सपा | ५,५०६ |