मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप वि. काँग्रेस आणि शिवसेना वि. राष्ट्रवादी सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजप पुढे काँग्रेसचं तर शिवसेने समोर राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे. भाजप विरोधात १७ मतदारसंघात काँग्रेस लढणार आहे तर राष्ट्रवादीविरोधात १२ मतदासंघात शिवसेना मैदानात असणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता जवळपास कोणता पक्ष कोणत्या पक्षाच्या विरोधात लढणार हे हे चित्र स्पष्ट झालं आहे.
आगामी निवडणुकीत युतीची घोषणा झाल्यानंतर काही ठिकाणी इच्छूक उमेदवारांकडून बंड होण्याची देखील चिन्ह आहेत. पण आता पक्षाचे नेते याला रोखण्यात किती यशस्वी होतात हे आगामी काळातच कळेल. युती झाल्यानंतर राज्यात लोकसभेच्या २५ जागा या भाजप तर २३ जागा शिवसेना लढवणार आहे. सध्या भाजपकडे असलेली पालघरची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये झालेल्य़ा लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४२ जागा या युतीने जिंकल्या होत्या. मोदी लाटेचा मोठा फायदा यावेळी येथे शिवसेना-भाजपला झाला होता.
मुंबई उत्तर-पश्चिम, रत्नागिरी, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, रामटेक, दक्षिण मध्य मुंबई, शिर्डी, औरंगाबाद, पालघर.
उत्तर मुंबई, पुणे, उत्तर मध्य मुंबई, सांगली, लातूर, नंदुरबार, अकोला, वर्धा, धुळे, नागपूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, जालना, भिवंडी, दक्षिण मुंबई, सोलापूर.
कल्याण, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, मावळ, परभणी, शिरुर, अमरावती, रायगड, बुलढाणा, उस्मानाबाद, कोल्हापूर.
ईशान्य मुंबई, अहमदनगर, दिंडोरी, जळगाव, रावेर, भंडारा-गोंदिया, बीड.