जाणून घ्या 'हायप्रोफाईल' उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील राजकीय गणिते

येथील मतदार शेवटच्या क्षणापर्यंत आपले पत्ते खुले करत नाहीत.

Updated: Apr 8, 2019, 08:57 PM IST
जाणून घ्या 'हायप्रोफाईल' उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील राजकीय गणिते title=

मुंबई: पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त या हेवीवेट लढतीमुळे यंदा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. येथील मतदार शेवटच्या क्षणापर्यंत आपले पत्ते खुले करत नसल्याने उत्तर मध्य मुंबईची लढत प्रत्येकवेळी रंगतदार अशीच होते. मुंबईतला हायप्रोफाईल मतदारसंघ अशी याची ओळख आहे. 

उत्तर मध्य मतदारसंघात बॉलिवूड कलाकारांची घरं, कुर्ला, कलीनामधल्या झोपडपट्ट्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात ५ लाख ७३ हजार मराठी मतदार, साडे तीन लाख मुस्लिम, अडीच लाख उत्तर भारतीय, गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तर ७३ हजार ३८७ ख्रिश्चन मतदार आहेत. २०१४ मध्ये पूनम महाजन जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघावर कुठल्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाचा दबदबा नाही. त्यामुळे इथल्या मतदारांच्या मनात काय चाललंय, ते २३ मे रोजीच समजू शकेल.