रेल्वेत स्टंटबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात

स्टंंटबाजांना घेतलं ताब्यात

Updated: Aug 2, 2018, 09:28 AM IST
रेल्वेत स्टंटबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : मुंबईतल्या हार्बर मार्गावर स्टंटबाजी करून दिव्यांग व्यक्तीचा मोबाईल चोरणाऱ्या चौघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी दिवसभर चार  स्टंटबाज तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा सगळा प्रकार रविवारी सकाळी घडला. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावर हे चार युवक स्टंटबाजी करत होते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर वडाळा रेल्वे पोलीसांनी या चार युवकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. बुधवारी संध्याकाळी चौघेही पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.