पंतप्रधानांच्याहस्ते मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. 

Updated: Sep 7, 2019, 12:12 PM IST
पंतप्रधानांच्याहस्ते मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले. 

याआधी सकाळी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिराच्या मंडपात पोहोचून त्यांनी श्रीगणेशाचे दर्शन घेत पूजाअर्चा केली.