'छोटा मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ

सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल

Bollywood Life | Updated: Sep 11, 2022, 12:12 AM IST
'छोटा मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ  title=

Little Boy Eknath Shinde Viral Video : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवावेळी अनेक ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. या भेटी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेत असल्याची टीका विरोधक करत आहेत. मात्र अशातच एका लहान चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. 

काय आहे व्हिडीओमध्ये: 
एका लहान चिमुकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा केली आहे. पांढरा शर्ट, पांढरी पँट, दाढी आणि चष्मा घातलेला दिसत आहे. गणपती मंडळाच्या वेशभूषा स्पर्धेमध्ये चिमुकल्याने ही वेशभूषा केल्याची माहिती समजत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. 

 

दरम्यान, एकनाथ शिंदेंसारखा हुबेहुब दिसणारा विजय माने यांचेही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पुण्यातील गणपती मंडळांमध्ये माने यांना आरतीसाठी  बोलावलं जात होतं. विसर्जन मिरवणुकीमध्येही मानेंना आमंत्रणं आली होतीत.