मुंबई : आजपासून २०१८ या नविन वर्षाला सुरूवात झालीय. यावर्षी गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्ट्या रविवारी आल्याने चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ होणार आहे. २०१८ हे वर्ष लीप वर्ष नसल्याने या वर्षात ३६५दिवस आलेत.
यावर्षी तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे आहेत. यापैकी दोन खग्रास चंद्रग्रहणे ३१ जानेवारी आणि २७ जुलै या दिवशी भारतातून दिसणार आहेत. तर दुसरीकडे विवाह इच्छुकांना विवाहमुहूर्तासाठी थोडी धावपळ करावी लागणार आहे.
जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत. 2018 हे वर्ष साईबाबांच्या समाधी शताब्दी महोत्सवाचं आहे.