यंदाच्या वर्षातील आज शेवटची अंगारकी चतुर्थी

आज अंगारकी चतुर्थी आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीरात सोमवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

Updated: Nov 7, 2017, 07:51 AM IST
यंदाच्या वर्षातील आज शेवटची अंगारकी चतुर्थी title=

मुंबई : आज अंगारकी चतुर्थी आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीरात सोमवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

आजची अंगारकी चतुर्थी वर्षातील शेवटची अंगारकी आहे. यानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीये. मुंबईसह उपनगरातून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आले आहेत. दादरमधील प्रभादेवी परिसर भाविकांनी फुलून गेलाय. मोठ्या गर्दीमुळे काही भाविक मुख दर्शन घेऊन किंवा कळस दर्शन घेऊन समाधान मानत आहेत.

पुण्यातील प्रसिद्धी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलीये. पहाटे ३ वाजल्यापासूनच दर्शनासाठी मंदिर खुले झालं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त ''स्वराभिषेक'' आणि ''गणेशयाग'' या दोन मुख्य कार्यक्रमांचं आयोजन केलंय.

स्वराभिषेक या कार्यक्रमात प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी पहाटे गायन केलं. तर सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत गणेशयाग होणार आहे. अंगारकीनिमित्त ट्रस्टतर्फे कळसासह संपूर्ण मंदिरात तोरणसह आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये. भव्य रांगोळ्या काढण्यात आल्यात. राज्यभरातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी आले आहेत.