किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा गंभीर आरोप

 जमिनी खरेदी-विक्री करून विकासकांसोबत पार्टनशिप करणे हा व्यवसाय आहे का? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला. 

Updated: Nov 19, 2020, 03:52 PM IST
किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा गंभीर आरोप  title=

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे परिवाराचा नेमका व्यवसाय काय हे त्यांनी स्पष्ट करावे असे सोमय्या म्हणाले. जमिनी खरेदी-विक्री करून विकासकांसोबत पार्टनशिप करणे हा व्यवसाय आहे का? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला. 

अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यात व्यवहार झालेल्या जमिनीचे ३० सात बारा समोर ठेवत असल्याचे सोमय्या म्हणाले. मी विचारलेल्या आधीच्या पाच प्रश्नांचे उत्तर द्यायला ठाकरे अजूनही तयार नाहीत. संजय राऊत यांनी मला शेवटची वॉर्निंग देतायत. संजय राऊत यांच्यात हिम्मत असेल तर मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर द्या असे सोमय्या म्हणाले. तर दुसरे नेते मला जेल आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात चढाओढ लागलीय असेही ते म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रात वैजनाथ, कर्जतच्या जागेची माहिती संशयास्पद आहे. सर्व्हे A आणि B यांची नोंद सारखीच आहे. अशा पद्धतीने जमिनीची सारखीच नोंद असते का ? असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केलाय. 

आदित्य ठाकरे हे जेव्हा मंत्री झाले तेव्हा ते व्यवसायही करत होते, काही व्यवहार झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत ऑफीस ऑफ प्रॉफीट झालंय. तेव्हा याबाबाबत मुख्यमंत्री यांनी बोलावे असे सोमय्या म्हणाले.