धक्कादायक, केईएम रूग्णालयातील इंटर्न डॉक्टर बेपत्ता

महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील एक डॉक्टर गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आलेय. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

Updated: Aug 3, 2018, 06:11 PM IST
धक्कादायक, केईएम रूग्णालयातील इंटर्न डॉक्टर बेपत्ता title=

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील एक डॉक्टर गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आलेय. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

इंटर्न डॉक्टर म्हणून काम करणारे अजिंक्य मौर्य हे मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. अजिंक्य मौर्य सोमवारी संध्याकाळपासून घरी आलेले नाही. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केलाय. मित्राकडे जायचे आहे, असे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, चार दिवस झाले तरी ते घरी आलेले नाहीत. तसचे चार दिवसांपासून ते हॉस्टेलमध्ये पोहचलेले नाहीत.

दम्यान, डॉ. अजिंक्य मौर्य यांचा मोबाईलही हॉस्टेलमध्येच आहे. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, अजिंक्य कोणाला दिसला तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आलेय.