कपिलच्या फिरंगी सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज

'सजना सोने जिहा' असं हे गाणं आहे, यात कपिल शर्मा आणि इशिता दत्ताची केमेस्ट्री पाहायला मिळते.

Updated: Nov 3, 2017, 09:21 AM IST

मुंबई : कपिल शर्माचा दुसरा चित्रपट 'फिरंगी'ची सध्या चर्चेत आहे, या चित्रपटाचं आणखी एक गाणं देखील यूट्यूबवर रिलीज झालं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांच्या माध्यमातून कपिलच्या चित्रपटांची झलक दिसून येत आहे.

फिरंगीचं काही दिवसापूर्वी ओय फिरंगी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, आता यातलं दुसरं गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. 'सजना सोने जिहा' असं हे गाणं आहे, यात कपिल शर्मा आणि इशिता दत्ताची केमेस्ट्री पाहायला मिळते.