मुंबई : कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा पत्रीपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ही एक खुशखबर आहे. हैदराबादहून ७ गर्डर नुकतेच कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या या ऐतिहासिक पुलाला तडा गेल्यामुळे २०१८ साली पाडण्यात आला होता. १०४ वर्ष जुना पूल पाडल्यामुळे याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
अखेर आता हे गर्डर कल्याणमध्ये दाखल झाल्यामुळे लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. असं आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या पत्रीपूलाचे काम देखील सुरू आहे आणि जून पर्यंत तिसऱ्या पत्रीपूलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर पत्रीपूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. हैदराबादमधील ग्लोबल स्टील कंपनीला त्यांनी भेट दिली होती.
२०१८ साली हा ऐतिहासिक पूल पाडण्यात आला होता. पूल पाडल्यामुळे या मार्गावरून वाहने चालवनं फार जिकरीचं झालं आहे. शिवाय एकच उड्डणपूल असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न फार गंभीर होत आहे. तर आता कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला होण्याचं चित्र दिसत आहे.