Kalicharan Maharaj Controversial Statement : कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. धर्मासाठी खून करणं वाईट नाही असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. हिंदू धर्मातील देव देवता यांचा दाखला देत कालीचरण महाराज यांनी खून करण्याचं समर्थन केले आहे. यावेळी काली चरण महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील नाव घेतले आहे. कालीचरण महाराज यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला उफाळून येण्याला तोंड फुटणार आहे.
एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालिचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे कालिचरण महाराज म्हणाले. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो.
हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज, राणा प्रतापसिंह महाराज यांनी मारामाऱ्या केल्या म्हणून तर आपण त्यांना पूजतो. हिंदू धर्मातील देव देवतांन आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
खून करण्याचे समर्थन करताना कालिचरण महाराज यांनी हिंदू देव-देवतांची नाव घेतली. पण त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही उल्लेख हिंसक म्हणून केला आहे. यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. देशात एकीकडे धर्मावरून वाद वाढत असताना कालिचरण महाराज सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब पूनावालाने तिचे 35 तुकडे करुन जंगलात फेकले. घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू धर्माच्या वतीने लव्ह जिहाद कायदा करण्याच्या मागणीसाठी हमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये कालीचरण महाराज सहभागी झाले होते. डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग डोकं ठिकाण्यावर येईल, सर्व भूत प्रेम तंत्र मंत्र बाहेर येईल, असा दावा कालीचरण महाराजांनी यावेळी केला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मुस्लिमांवर विश्वास ठेवू नका. रोज 1 लाख गोवंश हत्या होतात. हिंदू द्वेष करत नाही मात्र हिंदूंच्या मनात द्वेश निर्माण होत आहे, असा दावाही कालीचरण महाराजांनी केला होता. लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह देशभरात लागू करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती.