मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध काळाघोडा फेस्टिव्हलला सुरुवात झालीय.
पर्यटन विभाग आणि पालिकेच्या मदतीने या दरवर्षी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये विविध वस्तूंचे स्टॉल्स, टाकाऊपासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स लक्षवेधी ठरतायत. या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागलीय. इथल्या विविध कलाकृती पाहण्यासाठी लहान-थोर गर्दी करतायत. रविवारचा दिवस असल्याने काळा घोडा फेस्टिव्हलला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
क्रॉस मैदानावरील सांस्कृतिक कार्यक्रमांना ५ फेब्रुवारीपर्यंत परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. यामुळे आजपासून सुरू होत असलेल्या काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये क्रॉस मैदानावरील नियोजित उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा कार्यक्रम झाला नाही.