मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी व पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत असून चौथ्या टप्प्यातील आंदोलन आजपासून सुरू झालं आहे.
आज राज्यातील 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे 'जेलभरो 'आंदोलन करण्यात येईल. आझाद मैदान येथील आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व नाइलाजाने १२ वी बोर्ड परीक्षेच्या काळात 'बहिष्कार आंदोलन' करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला आहे.
१) १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे.
२) २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे.
३) सर्व शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर निवड श्रेणी देणे.
४) कायम विना अनुदानित कडील शिक्षकांना अनुदान द्यावे.
५) माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे.
६) २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.
७) सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.