पुढचं वर्ष सुट्ट्यांचं; 2024 मध्ये शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टया, आताच भटकंतीचे बेत आखा

शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांपासून नोकरीवर (Job News) जाणाऱ्यांपर्यंत आणि अगदी घर सांभाळणाऱ्या गृहिणींपर्यंत प्रत्येकालाच कामातून मिळणारी सुट्टी कायमच हवीहवीशी वाटते. शाळेच्या पहिल्या दिवशी दैनंदिनीमध्ये किंवा शाळेच्या एखाद्या मासिकामध्ये छापून येणारी सुट्ट्यांची यादी ज्याप्रमाणं पाहिली जाते, अगदी त्याचप्रमाणे आणि त्यात उत्सुकतेनं नोकरदार वर्गही येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याला नेमक्या किती सुट्या मिळणार याचीच प्रतीक्षा करत असतो. 

सायली पाटील | Updated: Nov 17, 2023, 09:32 AM IST
पुढचं वर्ष सुट्ट्यांचं; 2024 मध्ये शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टया, आताच भटकंतीचे बेत आखा title=
Job News Holidays list in 2024 declared by maharashtra state government

Holiday List 2024 : शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांपासून नोकरीवर (Job News) जाणाऱ्यांपर्यंत आणि अगदी घर सांभाळणाऱ्या गृहिणींपर्यंत प्रत्येकालाच कामातून मिळणारी सुट्टी कायमच हवीहवीशी वाटते. शाळेच्या पहिल्या दिवशी दैनंदिनीमध्ये किंवा शाळेच्या एखाद्या मासिकामध्ये छापून येणारी सुट्ट्यांची यादी ज्याप्रमाणं पाहिली जाते, अगदी त्याचप्रमाणे आणि त्यात उत्सुकतेनं नोकरदार वर्गही येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याला नेमक्या किती सुट्या मिळणार याचीच प्रतीक्षा करत असतो. 

जिथं सरकारी कर्मचाऱ्यांवर गडगंज पगारासोबतच सुट्ट्यांचीही बरसात असते तिथं खासगी क्षेत्रात काम करणारी मंडळी मात्र सुट्टीसाठी निमित्त शोधत असता. अशीच अनेक निमित्त अर्थात सुट्ट्यांची कारणं 2024 या वर्षात मिळणार आहेत. कारण, पुढच्या वर्षी शनिवार आणि रविवार अशा आठवडी सुट्ट्यांना जोडून अनेक सुट्ट्या आल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य शासनानं 2024 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी नुकतीच जाहीर केली. विविध धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या- उत्सवांनिमित्त 24, अतिरिक्त 1 अशा 25 सुट्ट्या राज्य शासनानं जाहीर केल्या. या सुट्ट्यांपैकी 9 सुट्ट्या शनिवार आणि रविवारला लागूनच आल्या आहेत. त्यामुळं सुट्ट्यांचा आनंद खऱ्या अर्थानं द्विगुणित झाला आहे. 

कधी आणि कोणत्या तारखांना आहेत या सुट्ट्या? 

नव्या वर्षातील पहिलीच सुट्टी आली आहे 26 जानेवारीला आणि निमित्त आहे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं. शुक्रवारी प्रजासत्ताक दिन आल्यामुळं पुढं लागून आलेल्या शनिवार, रविवारमुळं हा पहिला लाँग वीकेंड ठरणार आहे. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची चांदीच आहे, पण खासगी क्षेत्रातील कर्मचारीही हा लाभ घेऊ शकतात. 

पुढची लागून आलेली सुट्टी आहे 19 फेब्रुवारी (सोमवार). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त असणारी ही सुट्टी शनिवार आणि रविवारला लागून आल्यामुळं बहुतांश संस्थांना (विशेषत: खासगी) रजा असणार आहेत. पुढं महाशिवरात्री (8 मार्च) शुक्रवार , होळी (25 मार्च) सोमवार, गुडफ्रायडे ( 29 मार्च) शुक्रवार, बकरी ईद (17 जून) सोमवार, ईद ए मिलाद ( 16 सप्टेंबर) सोमवार , दिवाळी अमावास्या (लक्ष्मीपूजन) (1 नोव्हेंबर ) शुक्रवार आणि गुरुनानक जयंती ( 15 नोव्हेंबर) शुक्रवार, अशा सुट्ट्या शनिवार- रविवारला जोडून आल्या आहेत. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच काही खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनाही सलग तीन दिवसांचा सुट्ट्यांचा फायदा घेता येणार आहे.  

हेसुद्धा वाचा : मुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार Job

 

9 सुट्ट्या शनिवार- रविवारला लागून आल्या असल्या तरीही पाच सुट्ट्या अर्थात पाच महत्त्वाचे दिवस मात्र शनिवारी आणि रविवारी आले आहेत. त्यामुळं या सुट्ट्या आठवडी सुट्टीमध्ये ग्राह्य धरल्या जातील. हे दिवस आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, बकरी ईद, गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी बलिप्रतिपदा.  महाराष्ट्र राज्य शासनाकडून 3 नोव्हेंबरला भाऊबीजेची सुट्टी जाहीर केली खरी, पण रविवार असल्यामुळं ती सुट्टीही Week Off मध्येच जाणार आहे.