मुंबई : शेतकरी आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठकीत ज्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे, ती आश्वासनं जीवा पांडू गावित शेतकऱ्यांना वाचून दाखवणार आहेत. मात्र या तोडग्यानं शेतकऱ्यांचं समाधान होईल किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळ आझाद मैदानाकडे रवाना झालं आहे. थोड्याच वेळात सरकारची आश्वासन वाचून दाखवली जाणार आहेत. लेखी स्वरूपात आपल्याला आश्वासन सरकारने द्यावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
दुसरीकडे आंदोलकांनी लेखी आश्वासन मागितलं आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं आंदोलनकांनी म्हटलं आहे.
वन जमिनीच्या बाबतीत येत्या ६ महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी यांच्यात ही बातचीत झाली.
जुन्या शिधापत्रिका तीन महिन्याच्या आत बदलून देणार असल्याचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलं आहे.