वैद्यकीय शिक्षण विभाग रविवारच्या सुट्टीवर, आरोग्य सेवा सलाईनवर

अधिकारी सुट्टीवर असल्याने संप लांबत चालला आहे. त्याचा फटका रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसतोय. 

Updated: May 20, 2018, 12:27 PM IST
वैद्यकीय शिक्षण विभाग रविवारच्या सुट्टीवर, आरोग्य सेवा सलाईनवर title=

मुंबई : जे जे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप आजही मिटण्याची चिन्हे नाहीत. सुमारे ४०० हून अधिक निवासी डॉक्टर संपावर असल्यानं जे जे रूग्णालय, सेंट जॉर्ज रूग्णालय, कामा रूग्णालय आणि जीटी रूग्णालय या चारही रूग्णालयांच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. रविवारचा दिवस असल्याने अधिकारी सुट्टीवर आहेत. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करायची असा प्रश्न मार्डच्या डॉक्टरांना पडला आहे.

लांबलेल्या संपाचा रूण, नातेवाईकांना फटका

अधिकारी सुट्टीवर असल्याने संप लांबत चालला आहे. त्याचा फटका रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसतोय. याचा परिणाम म्हणून वैद्यकीय शिक्षण विभाग रविवारच्या सुट्टीवर, आरोग्य सेवा मात्र सलाईनवर असे चित्र निर्माण झाले आहे. मार्डच्या डॉक्टरांना चर्चा करायची आहे. पण, त्यासाठी अधिकारी मात्र हजर नाहीत. मग आता चर्चा कोणाशी करायची हा सवाल डॉक्टरांसमोर आहे. त्यात चर्चा झाल्याशिवाय मार्ग कसा निघणार हा प्रश्न आहे.

 एका बैठकीत तोडगा नाही

दरम्यान, असा परिस्थीतीत चारही रूग्णालयातील रूग्णांना होणाऱ्या त्रासापेक्षा अधिकाऱ्यांना सुट्टी अधिक महत्वाची वाटते का ? असा सवाल रूग्ण, नातेवाईक आणि विविध स्थरातील मंडळी विचारू लागली आहेत. नाही म्हणायला मार्ड आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांच्यात बैठक झाली. पण, या बैठकीत कोणताही ठोस तोडगा नाही. अशाच प्रकारची बैठकप्रशासनासोबत रात्री उशिरा होणार होती. मात्र, ही बैठकही अद्याप झालीच नाही. काल २ निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर मार्डने कामबंद आंदोलन सुरू केले आहे., दोन वर्षांपूर्वी अलार्म सिस्टीम बसवण्याचे मान्य करूनही बसवली न गेल्याचा आरोप मार्डचाने केला आहे.