दहशतवादी कटाच्या मास्टरमाईंडला अखेर अटक, मुंबई एटीएसची मोठी कारवाई

ISI terror module mastermind​ : उत्तर प्रदेशातून दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.  

Updated: Sep 18, 2021, 08:47 AM IST
दहशतवादी कटाच्या मास्टरमाईंडला अखेर अटक, मुंबई एटीएसची मोठी कारवाई title=
संग्रहित छाया

मुंबई : ISI terror module mastermind : उत्तर प्रदेशातून दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. नागपाडा भागातून संशयिताला अटक करण्याता आली आहे. मुंबई ATSने धडक कारवाई करत ही अटक केली आहे. दहशतवादी कट प्रकरणात मुंबई एटीएसने मोठी कारवाई केली. नागपाड्यातून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले. झाकीर नावाचा संशयित दहशतवादी एटीएसने ताब्यात घेतला आहे. नव्या कटाबाबात दिल्ली आणि मुंबई एटीएसची आतापर्यंत 7 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.(ISI terror module mastermind Humaidur Rehman caught from Prayagraj in UP )

दहशतवाद्यांचा प्लान बी उघड, असा रचला होता पुढचा कट

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून पकडलेल्या आयएसआय टेरर मॉड्यूलचा मास्टरमाईंड याने संशयित दहशतवादी झिशान आणि ओसामाला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवण्यात मदत केली. उत्तर पोलिसांनी आयएसआय आणि अंडरवर्ल्ड टेरर मॉड्यूलच्या मास्टर माइंड्सपैकी एक हुमायदूर रहमान याला पकडले आहे.

हुशैदूर रहमान याने झिशान आणि ओसामाला पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठवण्यास मदत केली. झिशानला दहशतवादी प्रशिक्षणासाठी अनेक महिने कट्टरपंथी बनवण्यात आले होते. प्रयागराजमधून पकडलेला हुमैदूर रहमान याला आता लखनऊला पाठविले जाणार आहे. 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम लखनऊ बाहेर पडली आहे. हुमाईदूरला उत्तर प्रदेश पोलीस दिल्ली पोलिसांच्या हाती देतील. त्यानंतर या दहशतवाद्याचा ताबा दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल घेईल.