मुंबई : आपल्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचे फोन टॅप केले गेल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. अनेक नेत्यांवर पाळतही ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधी नेत्यांनी केल्या होत्या. तर राजकारण्यांचे फोन टॅप झाले नव्हते असं तत्कालीन सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीपद सांभाळलेल्या दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी सुरू करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांसह अनेक नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ही माहिती दिली.
फडणवीस सरकारच्या काळातल्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे. आपल्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचे फोन टॅप केले गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. अनेक नेत्यांवर पाळतही ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारीही फडणवीस सरकारच्या काळात विरोधी नेत्यांनी केल्या होत्या. त्याचीही दखल घेण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कोरेगाव भीमाप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दोशींवर कारवाई ही पुराव्यांच्या आधारेच केली असल्याचं म्हटले आहे. तर दुसरीकडे राजकारण्यांचे फोन टॅप झाले नव्हते असे तत्कालीन सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीपद सांभाळलेल्या दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळातल्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीय. तर राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्यसरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नसल्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीचा करण्याचा प्रस्ताव गृहखात्यासमोर असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी 'झी २४ तास'ला दिली. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीकडे संशयाने पाहिलं जात आहे. त्याबाबत आमच्याकडे अनेक निवेदने आली असल्याचंही देशमुखांनी सांगितले.
भाजपच्या विचाराच्या विरोधात जाऊन कोणी विचार मांडले की त्याला अर्बन नक्षल ठरवण्याची भूमिका मागच्या सरकारची होती असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे या सर्व तक्रारींची शहानिशा करणार असल्याची माहिती त्यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत दिली.