अखेर सापडलेच! रेल्वेतूनच व्हायचा तिकिट घोटाळा; ट्रेन बोरिवलीत आल्यावर 'अशी' झाली पोलखोल

India Railway:  पश्चिम रेल्वेच्या विजिलन्स टीमने तात्काल तिकिटांची हेराफेरी करणऱ्या पेंट्रीकार मॅनेजर आणि कोच अटेंडंटला ताब्यात घेतले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 13, 2023, 10:07 AM IST
अखेर सापडलेच! रेल्वेतूनच व्हायचा तिकिट घोटाळा; ट्रेन बोरिवलीत आल्यावर 'अशी' झाली पोलखोल title=

India Railway: सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना रेल्वे तिकिट मिळणे खूप कठीण होऊन जाते. अचानक सीट फुल झाल्याचे समजल्याने नागरिक हैराण होतात. पण यामागे दलालांची मोठी साखळी कार्यरत असते. त्यांना रेल्वेत काम करणारे काही कर्मचारी मदत करतात. पण आता या कर्मचाऱ्यांचा भांडाफोड झालाय. अवंतिका एक्सप्रेससाठी खोटी मेडिकल सर्टिफिकेट जोडून बुक करण्यात आलेल्या 6 महिलांचे तिकिट सीज केले होते. हे तिकिट महिलांनी खोटे प्रेग्नेंसी  सर्टिफिकेट बनवून कोट्यातून बुक केले होते. पण खोटे सर्टिफिकेट बनवणाऱ्यांना आता अटक करण्यात आली आहे. आता पश्चिम रेल्वेच्या विजिलन्स टीमने तात्काल तिकिटांची हेराफेरी करणऱ्या पेंट्रीकार मॅनेजर आणि कोच अटेंडंटला ताब्यात घेतले आहे. 

पँट्रीकारकडून व्हायचा तिकीट पुरवठा

मुंबई सेंट्रल-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या पॅंट्री कार व्यवस्थापक आणि कोच अटेंडंटकडून काळ्या बाजारात तिकीटांचा पुरवठा व्हायचा. पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने या घोटाळेबाजांना रंगेहाथ पकडले आहे. जयपूरहून मुंबईला येणाऱ्या या ट्रेनमध्ये तत्काळ तिकीट पुरवठा झाल्याची बातमी  दक्षता पथकाला मिळाली होती. 

ट्रेन बोरिवलीला पोहोचली तेव्हा पँट्री कारचे कर्मचारी एका व्यक्तीला तिकीट देत होते. यावेळी दक्षता पथकाने तिकीट घेणाऱ्या व्यक्तीसह पँट्रीकारच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. बोरिवलीत तिकीट काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे तिकीट सीकरमध्ये बुक करण्यात आल्याचे दक्षता पथकातील एका सदस्याने सांगितले.

चौकशीत त्यांच्या भावाने तिकीट बुक केल्याचे समोर आले. याशिवाय आणखी 14 तिकिटे होती, ज्याबद्दल पॅन्ट्री कार मालक जास्त माहिती देऊ शकला नाही. या तिकिटांची किंमत सुमारे 70 हजार रुपये असून ती जप्त करण्यात आली आहेत.

पुरवठ्याबाबत मिळाली होती तक्रार

पीक सीझनमध्ये कोच अटेंडंट किंवा पॅन्ट्री कारचे मालक अनेकदा दलालांसाठी कुरिअरच् काम करतात. अनेक वेळा लोक त्यांच्यामार्फत नातेवाईकांना तिकिटेही पाठवतात. 10 नोव्हेंबर रोजी टाकलेल्या छाप्यातही दोन-तीन तिकिटे नातेवाइकांची होती, मात्र चौकशीत तपशील देण्यात आलेली नसलेली तिकिटे जप्त करण्यात आली. या संघात संजय व्यतिरिक्त संदीप गोलतकर, चंपालाल पाटील, हरीश आणि अजय बडगुजर यांचा समावेश असल्याची माहिती दक्षता संघाचे सदस्य संजय शर्मा यांनी दिली.

छापेमारीनंतर गोंधळ

छाप्यानंतर मुंबई सेंट्रलमध्ये तिकीट खरेदीसाठी आलेल्या काही लोकांनी स्टेशनवरील आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील एक तिकीट आरपीएफ कर्मचाऱ्याच्या मुलाचे असल्याचे आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय काही जप्त केलेली तिकिटे घेण्यासाठी प्रवासी सायंकाळी आले असता तिकीट न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला. मात्र, तिकिटांचा पुरवठा सुरू असल्याने छापा टाकण्यात आल्याचे चे दक्षता पथकाने स्पष्ट केले.