India Bank Loses Rs 34984 Crore In 4 days: शेअर मार्केटमध्ये होत असलेल्या पडझडीचा फटका अनेक भारतीय कंपन्यांना बसला आहे. अनेक भारतीय कंपन्यांच्या एकूण संपत्तीमध्ये झपाट्याने घट होताना दिसत आहे. मागील आठवड्यामध्ये भारतातील अव्वल 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांनी 1 लाख 65 हजार 180 कोटी 4 लाख रुपये गमावले आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेला तर तब्बल 34 हजार 984 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
मागील आठवड्याच्या सुरुवातील म्हणजेच सोमवार ते गुरुवारदरम्यान म्हणजेच 11 ते 14 नोव्हेंबरदरम्यान भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला तब्बल 34984 कोटींचा फटका बसला होता. एसबीआयचे शेअर्स 4.62 टक्क्यांनी घसरल्याने हा आर्थिक फटका बसला होता. एसबीआयला बसलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक फटक्यापैकी एक आहे. एसबीआयचं बाजार मूल्य या कालावधीमध्ये 34,984 कोटी 51 लाखांनी घसरून 7,17,584 कोटी 7 लाखांवर आलं. 14 नोव्हेंबर रोजी एसबीआयचे शेअर्स प्रती शेअर 805.95 रुपयांपर्यंत घसरले.
त्यापूर्वीच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी गुरुनानक जयंतीच्या दिवशी बीएसईचा निर्देशांक 1906.01 अंशांनी पडला होता. ही पडझड 2.39 टक्क्यांची होती. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार मूल्य 22,057 कोटी 77 लाखांवरुन 17,15,498 कोटी 91 लाखांपर्यंत घसरलं होतं.
या पडझडीमध्येही अंबानींची रिलायन्स कंपनी ही सर्वाधिक मूल्य असलेल्यी कंपनी ठरली. त्या खालोखाल टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीस, एसआयसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचा समावेश आहे.
नक्की वाचा >> 100 वर्षांपासून सुरु आहे 'हा' प्रयोग! आणखी 100 वर्ष सुरु राहणार World's Longest Experiment
एसीबीआयने आपल्या फंडबेस रेटमध्ये म्हणजेच एमसीएलआरमध्ये पॉइण्ट 5 ने वाढ केली आहे. ही वाढ 15 नोव्हेंबपासून लागू झाली आहे. नव्या दरांनुसार बँकाचा तीन महिन्यांचा एमसीएलआर 8.50 टक्क्यांवरुन 8.55 टक्क्यांवर तर सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.85 टक्क्यांवरुन 8.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. एका वर्षासाठीचा एमसीएलआर 8.95 टक्क्यांवरुन 9 टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांचे ईएमआय अधिक महागले आहेत.
(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)