मुंबई: आयकर परतावा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. यापूर्वी आयकर खात्याने एका महिन्याने मुदत वाढवून दिली होती. जर आज आयकर परतावा न भरल्यास तुम्हाला किमान पाच हजार रुपयांचा दंड बसू शकतो.
गेल्या आर्थिक वर्षापर्यंत आयकर भरण्यास उशीर झाल्यास दंडाची तरतूद नव्हती. यावर्षी मात्र, कायद्यामध्ये २३४-F हे कलम समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ३१ ऑगस्टनंतर कर भरल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
त्यामुळे तुम्हाला आयकर परतावा भरायचा असेल, तर incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर तो भरता येईल.