तनुश्री दत्ता लैंगिक छळ प्रकरणात नाना पाटेकरांना क्लिन चीट

सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने लैंगिक छळ आणि गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप लावले होते.

Updated: May 16, 2019, 11:23 PM IST
तनुश्री दत्ता लैंगिक छळ प्रकरणात नाना पाटेकरांना क्लिन चीट title=

मुंबई : सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने लैंगिक छळ आणि गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप लावले होते. काही दिवस शमलेल्या या वादळाला आता नवीन वळण मिळले आहे. नाना पाटेकर यांच्या विरोधात एकही साक्ष मिळाला नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्या कारणाने पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिली आहे. 
'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते. तर चित्रपटाच्या नृत्यदिग्दर्शिका आणि अभिनेत्री डेझी शाह हिने सुद्धा आपल्याला दहा वर्षांपूर्वी घडलेल्या कोणत्याच घटना लक्षात नसल्याचं सांगितलं आहे. 
  
या सर्व प्रकरणावर खुदद् तनुश्रीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ते साक्षीदार होते तरी कोण?, असा प्रश्न तिने उपस्थित केला. ते माझ्या बाजूने होते की नानांच्या? ते नानांचे मित्र असतील तर ते माझ्या आणि त्यांच्या साक्षीत फरक हा आढळणारच. माझं शोषण झालं होतं, हे सिद्ध करण्यासाठी मला कोणा साक्षीदाराची गरज नाही', असं ती म्हणाली. 

जेव्हा छळाचा प्रश्न येतो, तेव्हा महिलेला न्यायालयात ते सिद्ध करणे फार कठीण असते. मी केलेल्या आरोपांवर पोलिसांनी फार धिम्या गतीने तपास केला. माझा छळ होताना अनेकांनी पाहिले होते, पण कोणीही माझे समर्थन केले नाही, आणि एका गुन्हेगाराला पाठींबा दिला. अशा प्रतिक्रिया तनुश्री दत्ताने दिल्या.