श्रावण सरी जोरदार बरसणार, 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये Orange Alert

पुढचे 4 दिवस पावसाचे! IMD कडून या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा 

Updated: Aug 4, 2022, 05:08 PM IST
श्रावण सरी जोरदार बरसणार, 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये Orange Alert title=

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने दडी मारली त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. आता शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी आहे. तर पावसाने दांडी मारल्याने उकाडा वाढला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना हा दिलासा आहे. पुढचे चार दिवस राज्यात पाऊस असणार आहे. 

राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून Orange Alert देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी मध्यम ते हलक्य स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, या जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार अति पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा, वाशिम, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.