वानखेडेंच्या चौकशीची मागणी मीच केली होती; नबाव मलिक यांचं वक्तव्य!

समीर वानखेडे यांनी केलेल्या दाव्यानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. 

Updated: Nov 6, 2021, 10:20 AM IST
वानखेडेंच्या चौकशीची मागणी मीच केली होती; नबाव मलिक यांचं वक्तव्य! title=

मुंबई : मुंबई ड्रग्ज प्रकरणात सातत्याने ट्विस्ट येत आहेत. एकीकडे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मोठा झटका बसलाय. मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांना हाय प्रोफाईल आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आलं. तर वानखेडे यांनी आपल्याला या तपासातून हटवलं नसल्याचं म्हटलंय. दुसरीकडे आर्यन खानसह 6 प्रकरणांची चौकशी एनसीबीमध्ये ऑपरेशन अफेयर्सचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्याकडून केली जाणार आहे.

दरम्यान समीर वानखेडे यांनी केलेल्या दाव्यानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. मीचं समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय. 

नवाब मलिक यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात, “आर्यन खानचं अपहरण आणि त्याच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी समीर दाऊद वानखेडेंची एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी मीच केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे आता बघुात यापैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचं सत्य जगासमोर आणतंय.”

इतकंच नव्हे तर काल देखील समीर वानखेडे यांच्या प्रतिक्रियेवर नवाब मलिक यांनी ट्विट केलं होतं. "समीर वानखेडे चुकीचं सांगून देशाची दिशाभूल करतायत. समीर वानखेडे यांच्या वतीने खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती फेटाळली गेली पण सत्य समोर यायला पाहिजे."

दरम्यान आर्यन खानप्रकरणासहित सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. या प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता संजय सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. हा प्रशासकीय निर्णय असल्याचं NCB चे पश्चिम विभागीय उप महासंचालक मुथा अशोक जैन यांनी स्पष्ट केलंय.