मुंबई : मुंबईच्या मानखूर्द रेल्वे स्टेशनबाहेर एका महिलेवर भीषण जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झालीय. महिला कामासाठी निघाली असताना विजय इंगळे याने तिच्यावर भर रस्त्यात पाठीमागून येऊन हल्ला केला. त्यानंतर सातत्याने तो तिच्यावर वार करत होता.
संतापजनक बाब म्हणजे सकाळची वेळ होती. मानखूर्द स्टेशनवर गर्दी होती, तरीही तिला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. हा सर्व प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय. विशेष म्हणजे हल्लेखोर आरोपी हा महिलेचा पतीच आहे. दोघांमध्ये पटत नसल्याने त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या आरोपीला अटक झालीय.