Maratha Reservation : संभाजीराजेंच्या आंदोलनाबाबत उदयनराजेंचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले

संभाजीराजेंच्या आंदोलनाला यश कसं मिळणार... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

Updated: Feb 28, 2022, 03:07 PM IST
Maratha Reservation : संभाजीराजेंच्या आंदोलनाबाबत उदयनराजेंचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) उपोषणाला बसले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हे उपोषण सुरु असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. उपोषणादरम्यान संभाजीराजेंची तब्येत बिघडली आहे. संभाजीराजे यांच्या शरीरातील शुगरचं प्रमाण कमी झालंय. त्यांना अशक्तपणा, डोकेदुखीही जाणवतेय. कुठलीही औषधं घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिलाय. 

दरम्यान, संभाजीराजेंच्या आंदोलनाबाबदत खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या यशाबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली आहे.

खासदार संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला यश येणार कसं असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही समाजातील लोकांनावर अन्याय होता कामा नये, यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. श्वेत पत्रिका जाहीर करण्याची मागणी अनेकवेळा करुनही ती जाहीर केली जात नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

दर दहा वर्षांनी जगगणना घेऊन कोणत्या जातीची किती लोकसंख्या वाढली याचा विचार होणं गरजेचं आहे, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल तरुणांची संख्या मोठी आहे. त्या निकषावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे, मराठा किंवा इतर कोणत्याही समाजातील सधन कुटुंबांना आरक्षण दिलं जाऊ नये असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.