मुंबई : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सर्व्हेत मराठा समाजासह, कोणत्या जाती किती प्रमाणात मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत, हे सर्वेत समोर आलं आहे. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा जास्त समाजाच्या मते, मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचं म्हटलं आहे. शेतीवरती अवलंबून असलेल्या मराठा समाज बिकट परिस्थितीत असल्याचं आयोगाच्या सर्वेत समोर आलं आहे. माथाडी कामगार, डबेवाला, हमाल यांच्यात मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचंही समोर आलं आहे.