Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात(Gram Panchayat Election Result ) भाजप-शिंदे गटानं(BJP, Shinde group ) धुराळा उडवला आहे. आतापर्यंतच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. शिंदे गट दुस-या स्थानी तर ठाकरे गट चौथ्या स्थानी आहे. आतापर्यंतच्या निकालात भाजपने सरशी मारली आहे. 7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
शिंदे-फडणवीसांकडून ग्रामपंचायत निवडणूक विजयाचा जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. हा जनतेनं आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. यातून मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असंही शिंदे-फडणवीसांनी म्हंटल आहे.
7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणाराय. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर ३४ जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.