Cyrus Mistry Death:पारशी समाजात अशा प्रकारे केले जातात अंत्यसंस्कार

कोविड काळात ही पद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती

Updated: Sep 5, 2022, 07:02 PM IST
Cyrus Mistry Death:पारशी समाजात अशा प्रकारे केले जातात अंत्यसंस्कार title=

मुंबई : टाटा सन्सचे (tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले. पारशी धर्मगुरूला भेटण्यासाठी ते गुजरातमधील उडवाडा येथे गेले होते. परतत असताना त्यांची कार डिव्हायडरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की मर्सिडीजचा पुढील भाग उडून गेला

सायरस मिस्त्री यांच्यासोबत आणखी तीन लोक उपस्थित होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायरस मिस्त्री यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर वरळी येथे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे पारशी पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार नसल्याची शक्यता आहे.

मात्र पारशी समाजामध्ये (parsi community) अंत्यसंस्कार कसे करतात याबद्दल अनेकांना कुतूहल असते. काही धर्मांमध्ये दहनविधी करून अंत्यसंकार केले जातात तर काही धर्मामध्ये मृतदेहाला पुरले जाते. मात्र पारशी समाजामध्ये या दोन्ही पद्धती वापरल्या जात नाहीत.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे अंतिम संस्कार झोरास्ट्रियन धर्मानुसार केले जाऊ शकतात.  या धर्मातील अंत्यसंस्काराची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. हिंदू धर्मात, लोक मृत शरीराला अग्नि किंवा पाण्याकडे सोपवतात. तर ख्रिश्चन आणि मुस्लीम लोक मृतदेह पूरतात. पण पारशी लोक अग्नी, पाणी आणि पृथ्वीला पवित्र मानतात. त्यांचा  विश्वास आहे की मृतदेह जाळल्याने अग्नि तत्व अपवित्र होते. त्याच वेळी, ते नदीत वाहून, पाण्याचे घटक आणि ते गाडल्याने पृथ्वी तत्व प्रदूषित होते. या कारणानमुळे ते मृत्यूनंतर मृतदेह आकाशाकडे सोपवतात.

मृतदेह आकाशाकडे कसे सोपवले जातात?
जगात पारशी समाजाची लोकसंख्या 1 लाखाच्या जवळपास आहे. यापैकी निम्म्याहून अधिक मुंबईत राहतात. मुंबईत टॉवर ऑफ सायलेन्स (tower of silenc) बांधण्यात आला आहे. त्याला दख्मा (dakhma) असेही म्हणतात. मृतदेह आकाशाकडे सोपवण्यासाठी या वर्तुळाकार जागेच्या वरती ठेवला आहे. मृतदेह सूर्यप्रकाशात सोडला जातो. यानंतर गिधाडे, गरुड आणि कावळे शव खातात. पारशी समाजातील लोक मृतदेहाला अपवित्र मानतात. मात्र सायरस मिस्त्री यांच्यावर या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

अंत्यसंस्काराच्या या पद्धतीवरून वाद का झाला?
कोरोनाच्या काळातही या पद्धतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हावेत अशी पारशी धर्मगुरूंची इच्छा होती. मात्र, ही पद्धत कोविड नियमांनुसार नव्हती. अशा प्रकारे संसर्ग पसरू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. हा विषाणू पक्ष्यांपर्यंतही पोहोचू शकतो. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

दरम्यान, गिधाडांची कमी होत असलेली संख्या हा पारशी समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षांपासून पारशी लोकांना या पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात अडचणी येत आहेत. जेव्हा गिधाडे शव खाण्यासाठी पोहोचत नाहीत तेव्हा ते कुजतात. अशा परिस्थितीत आता अनेकांनी हिंदू स्मशानभूमीत किंवा विद्युत स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे.