मुंबई : विद्यार्थी आंदोलन चिथवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला म्हणजे विकास पाठकला आज सकाळी अटक करण्यात आलं. हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ झाली आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत हिंदुस्थानी भाऊच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. वांद्रे कोर्टानं ही सुनावणी सुनावली आहे. विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला कोठडी सुनावण्यात आली आहे.
४ फेब्रुवारीपर्यंत तपासात काय सापडतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच महत्वाचं म्हणजे हिंदुस्थानी भाऊने आंदोलनाबाबत बिनशर्त माफी देखील मागितली आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत आहे. त्यावर काही उत्तर न मिळाल्यामुळे हिंदुस्थानी भाऊने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंदुस्थानी भाऊ यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी असे पर्यंत ही भेट शक्य नाही. मात्र त्यानंतर यांची भेट होईल का? यावर काही तोडगा निघेल का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
विद्यार्थी हे निरागस असतात, ही मुलं अठरा वर्षांच्या खालील आहेत. हे विद्यार्थी एके ठिकाणी कोरोनाशी लढतायत, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाशी लढतायत.
भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं आहे. भविष्यात या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही परीक्षा घेऊन अकरावी प्रवेश सुरुळीत करता यावा म्हणून हा आमचा उद्देश असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांना भडकावू नका, चर्चा किंवा काही सूचना करायची असेल तर राज्य सरकारशी करावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
संघटनांचं काय म्हणणं आहे त्याविषयी आमच्या चर्चा करावी, आज दहावी आणि बारावीला तीस लाख विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राच्या भौगलिक परिस्थितीचा विचार करावा आणि काय समस्या असतील तर आमच्याशी चर्चा करावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
कोरोना असताना विद्यार्थ्यांना बाहेर का आणलं असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारल आहे.