डी.एस.कुलकर्णीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.  

Updated: Jan 18, 2018, 10:33 AM IST
डी.एस.कुलकर्णीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी title=

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.  

डी. एस. कुलकर्णी यांना 19 जानेवारी म्हणजे शुक्रवार पर्यंत सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन दिलाय. मात्र, जामीन मंजूर करताना 19 तारखेपर्यंत पन्नास कोटी रुपये भरण्याची अट सुप्रीम कोर्टाने घातली होती. डी. एस. कुलकर्णी यांनी अद्याप तरी कोर्टात ही रक्कम जमा केलेली नाही. 

तसेच, पैसे भरण्याच्या अटीसह जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने डीएसकेंची याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे हायकोर्टात होणारी सुनावणी महत्वाची आहे.