Gunratna Sadavarte यांच्या अडचणी वाढल्या, सदावर्ते आता सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा पोलिसांना १७ एप्रिलपर्यंत ताबा घेण्याची परवानगी

Updated: Apr 13, 2022, 05:52 PM IST
Gunratna Sadavarte यांच्या अडचणी वाढल्या, सदावर्ते आता सातारा पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunratna Sadavarte ) अडचणी वाढल्या आहेत. कारण आता सदावर्तेंचा ताबा सातारा पोलीस ( Satara Police ) घेणार आहेत. सातारा पोलिसांना १७ एप्रिलपर्यंत ताबा घेण्याची परवानगी कोर्टानं दिली आहे. काही काळापूर्वी सदावर्तेंनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी सदावर्तेंवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जिथे गुन्हा घडतो, तिथे त्या गुन्ह्याची चौकशी केली जाते. त्यामुळे सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा मिळणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्तें यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर ७ आरोपींनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टानं ही मागणी फेटाळली. त्यामुळं आता सदावर्ते जामिनासाठी अर्ज करू शकतात. तर अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी या दोघा आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्यावरही आता आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे, असे म्हणत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली, ही रक्कम गोळा करण्यात जयश्री पाटील यांचा ही सहभाग असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाट म्हटलं आहे.