Gujarat Election Result 2022: "सर्वांनी ऐकून घ्या... गुजरात फक्त नांदी, मुंबई महापालिकेत तेच घडणार"

Mangal Prabhat Lodha: गुजरातमध्ये (Gujarat Result 2022) एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Updated: Dec 8, 2022, 05:04 PM IST
Gujarat Election Result 2022: "सर्वांनी ऐकून घ्या... गुजरात फक्त नांदी, मुंबई महापालिकेत तेच घडणार" title=
BJP Gujarat BMC Election

Gujarat Election And Mumbai BMC: गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (Narendra Modi) जादू पुन्हा चालल्याचं पहायला मिळालं आहे. नरेंद्र मोदी यांच्या झुंजावती दौऱ्यांमुळे काँग्रेसच्या (Congress) हातावरचा मळ देखील निघाला नाही. काँग्रेस कशीबशी 20 पर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे भाजपने (BJP) 150 चा आकडा गाठला आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये पुन्हा भाजपच गरबा खेळणार जाणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. (gujarat assembly election result 2022 bjp minister mangal prabhat lodha says bjp will win in mumbai bmc elections just like guj polls marathi news) 

गुजरातमध्ये (Gujarat Result 2022) एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मोठं वक्तव्य केलंय. गुजरात फक्त नांदी असून आगामी मुंबई महापालिकेत (BMC Election) असंच घडणार, असं म्हणत लोढा यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खुलं आव्हान दिलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 दिवस गुजरातमध्ये परिक्षम घेतले. त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा हा विजय आहे, असं लोढा म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी (Narendra Modi Gujarat) यांच्यावर गुजरातच्या जनतेने विश्वास दाखवला आहे. नवा इतिहास आता सुरू झालाय. मुंबई महापालिकेत असच घडणार आहे. सर्वांनी ऐकून घ्या... ही फक्त नांदी आहे, असंही मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha On BMC Election) म्हणाले आहेत. 

आणखी वाचा - Gujarat Result 2022: कोण होणार गुजरातचे मुख्यमंत्री? भाजपकडून 'या' बड्या नावाची घोषणा!

दरम्यान, गुजरातमधील विजयाचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात देखील भाजप कार्यालयात (BJP Office) जल्लोष पहायला मिळतोय. पुण्यात (Pune) आणि मुंबईत (Mumbai) भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे.