राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज कनेक्शन तोडण्याला स्थगिती

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. वीज कनेक्शन तोडण्याला  स्थगिती देण्यात आली आहे.

Updated: Mar 22, 2018, 10:21 PM IST
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज कनेक्शन तोडण्याला  स्थगिती  title=

मुंबई : राज्यातल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचं वीज कनेक्शन तोडण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. 

शेतक-यांच्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय़ घेतल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. शेतक-यांकडे 17 हजार कोटींची वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे महावितरणनं वीज जोडण्या तोडण्याचा धडाका लावला आहे.

मात्र याला विरोधकांनी जोरदार विरोध केला. तसेच  विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत वीज जोडण्या तोडण्याचा कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली. 

तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला स्थगिती देण्याची घोषणा केली. त्यामुळे आज दिवसभरात सरकारला तिस-यांदा माघार घ्यावी लागली.