मुंबईत सरकारी कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या

आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ...

Updated: Jun 23, 2018, 06:25 PM IST
मुंबईत सरकारी कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या title=

मुंबई : बांद्रा येथील शासकीय इमारतीमध्ये राहणाऱ्या राजेश भिगारे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. बायको आणि दोन मुलांसह राजेश भिगारे यांनी आत्महत्या केली. राजेश भिगारे यांचा मोठा मुलगा तुषार हा हॉटेल मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. तर गोरंग हा रुपारेल कॉलेजमध्ये बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत होता. आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालं नसून चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

राजेश भिंगारे हे मंत्रालयात शिधा वाटप विभागात शिपाई पदावर काम करत होते. भिंगारे कुटुंबाने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.