नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कौतुकास्पद

या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Updated: Jun 24, 2017, 04:50 PM IST
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कौतुकास्पद title=

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली, त्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदान देणे हा निर्णय कौतुकास्पद आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना न्याय देणारं हे पहिलंच सरकार आहे हे देखील म्हणण्यास हरकत नाही.

या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

योगी आदित्यनाथ सरकारने यूपीत एक लाखाची कर्जमाफी दिली, पण देवेंद्र फडणवीस सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय दिला आहे, यामुळे शेतकऱ्यांचं मनोधैर्य उंचावरणार तर आहेच, पण कर्ज नियमित परतफेड करण्यासही प्रोत्साहन मिळणार आहे.

कसे असेल नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान

नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान २५ टक्के अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे, म्हणजे तुम्ही १ लाख नियमित कर्ज भरलं असेल, तर तुम्हाला २५ हजार परत दिले जातील, आणि समजा तुम्ही २ लाख किंवा ३ लाखांचंही कर्ज नियमित भरलं असेल, तरीही तुम्हाला २५ हजार परत दिले जाणार.

ही रक्कम कमी असली, तरी नियमित कर्ज भऱणाऱ्यांना बोनस देण्याचा, मनोधैर्य वाढवण्याचा हा पायंडा पडणार आहे, यामुळे शेतीशी संबंधित कर्जावर याचे निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहेत.