मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु

रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात  होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.

Updated: Oct 7, 2017, 12:41 PM IST
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु title=

मुंबई : रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात  होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.

हा मोनो रेलचा टप्पा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडला आहे. येत्या डिसेंबरला ही मोनोरेल  सुरु करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी  एमएमआरडीएच्या बैठकीत दिले. त्याशिवाय यापुढं एकाच तिकीटावर बेस्ट, मेट्रो, मोनो आणि लोकल रेल्वे प्रवास करणं शक्य होणाराय. यासंदर्भातली एक तिकीट योजना डिसेंबरपासून सुरु करा, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मेट्रो ३ चं काम, इमारतींना तडे? 

दरम्यान, मेट्रो ३ चं काम सुरू असलेल्या भागात आजुबाजूच्या इमारतींना तडे गेल्याची टीका होत आहे. मात्र मेट्रो ३ चं काम सुरू होण्याआधीच या इमारतींना तडे गेले होते, असा दावा प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी केलाय. मेट्रो ३ चे कामसुरू असतांना इमारतींच्या सुरक्षेबाबत सर्व काळजी घेत असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्यामुळं कंपने जाणवतात, अशी कामं डिसेंबर-जानेवारीपर्यंत पूर्ण होतील, असंही त्यांनी सांगितलं. आवाजाचा त्रास आणखी काही काळ सहन करावा लागेल, असी पुस्तीही त्यांनी जोडली.