राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

Updated: Aug 16, 2022, 08:16 PM IST
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय title=

मुंबई : राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळणार आहे. 

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी त्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत होता. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.