मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुक भत्याच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्य़ात आला आहे. याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना आता तीन टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज वाहतूक भत्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ( state government increase in transport allowance)
केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर राज्य सरकारने ही कर्मचाऱ्यांना तीन टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. 1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरुन तो 31 टक्के करण्यात आला आहे.