गणेशोत्सवाआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, आधीच होणार पगार

गणेशोत्सवाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे.

Updated: Aug 25, 2022, 08:47 PM IST
गणेशोत्सवाआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, आधीच होणार पगार title=

मुंबई : मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टलाच पगार होणार आहे. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणार आहे. शासनानं यासंदर्भात काल परिपत्रक काढलं. 

2 वर्षानंतर गणेशोत्सव यंदा कोरोनाच्या कोणत्याही अटींविनाच साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा पगार आधीच जमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक जण गावी जातात तर अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होत असतात.

राज्य शिक्षक परिषदेने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पगार आधी मिळण्याबाबत निवेदन दिले होते.