Mumbai News: मुंबई एअरपोर्टवरून कोटींचं सोनं जप्त; कपड्यांनंतर बटरच्या बॉक्समधून सोन्याची तस्करी

Mumbai News: गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी मुंबई कस्टम झोन-III ने 10 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 3.65 कोटी रुपयांचे 6.78 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केल्याची माहिती आहे.

सुरभि जगदीश | Updated: Mar 9, 2024, 07:48 AM IST
Mumbai News: मुंबई एअरपोर्टवरून कोटींचं सोनं जप्त; कपड्यांनंतर बटरच्या बॉक्समधून सोन्याची तस्करी title=

Mumbai News: मुंबई एअरपोर्ट हे सर्वात व्यस्त असं एअरपोर्ट मानलं जातं. दररोज या विमानतळावरून लाखो प्रवाशी प्रवास करतात. या विमानतळावर सुरक्षा एजन्सी आणि कस्टमसारख्या एजन्सी देखील अतिशय एक्टिव्ह असल्याचं दिसून आहे. त्यामुळे विमानतळावरून दररोज कोट्यवधी रुपयांचं सोनं आणि तस्करीच्या अनेक वस्तू सीमाशुल्क जप्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या गोष्टींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. आहेत.

6.78 किलोपेक्षा जास्त सोन्याची जप्ती 

गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी मुंबई कस्टम झोन-III ने 10 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 3.65 कोटी रुपयांचे 6.78 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केल्याची माहिती आहे. तस्करी करण्यात आलेलं हे सोन कपडे तसंच चप्पल यांसारख्या वस्तूंमध्ये लपवण्यात आल्याचं समोर आलं आहे. चप्पलमधून सोने जप्त केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओमध्ये एक प्रवासी आपल्या चप्पलच्या तळाशी सोन्याची बिस्किटे कशी लपवत असल्याचं या व्हायरल व्हिडीओमधून दिसतंय.

काही दिवसांपूर्वीही घडली होती अशी घटना

मार्च महिन्याच्या सुरुवातीला देखील अशी घटना घडली होती. 3 मार्च रोजी मुंबई कस्टम्सने सोमवारी 10 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 3.03 किलोपेक्षा जास्त सोनं आणि 1.66 कोटी रुपये किमतींचे आयफोन जप्त केले होते. कस्टम विभागाने कारवाई करून तस्करांना पकडले.

कस्टम्सने दिलेल्या माहितीनुसार, तस्करांनी हे सोनं त्यांच्या शरीरात, विमानातील सीट, बॉडी कॅव्हिटी, वॉशरूम, अमूल बटर, हॅन्की आणि कपड्यांमध्ये लपवलं होतं.

अमूल बटरमधून निघालं होतं सोनं

यापूर्वी कस्टम अधिकाऱ्यांना पॅन्टच्या रबरमधून सोन्याचे छोटे तुकडे सापडले होते. त्याचबरोबर हे तुकडे रुमालात व्यवस्थित लपवून शिवून टाकण्यात आले होते. याशिवाय अमूलच्या बटर बॉक्समधून सोनं लपवल्याचंही समोर आलं होतं. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले.