Gold Price Today : स्वस्त झालं सोनं; चांदीचे दरही घसरले

जाणून घ्या दर...

Updated: Jun 21, 2021, 01:15 PM IST
Gold Price Today : स्वस्त झालं सोनं;  चांदीचे दरही घसरले title=

मुंबई : सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात तर लवकरात लवकर सोनं खरेदी करा. कारण आज 22 कॅरेट  सोन्यासाठी 46 हजार 210 रूपये मोजावे लागत आहे. तर रविवारी  22 कॅरेट सोन्यासाठी 46 हजार 220 रूपये मोजावे लागले होते. तर 24 कॅरेट  सोन्याचे भाव आज 47 हजार 201 रूपये आहे, तर रविवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 220 रूपयांवर पोहोचले. 

गेल्या आठवड्याचे सोन्याचे दर
सोमवार           48 हजार 523 रूपये 
मंगळवार         48 हजार 424 रूपये
बुधवार             48 हजार 506 रूपये
गुरूवार            46 हजार 958 रूपये
शुक्रवार            46 हजार 728 रूपये 

सोन्यासोबतचं चांदीचे दर देखील घसरले आहेत.  आज चांदीच्या दरात 200 रूपये प्रति किलो रूपयांनी घट नोंदवण्यात आली आहे. चांदीचे दर 67 हजार 400 रूपये किलो भोवती फिरत आहेत. गेल्या आठवड्याभरात चांदीचे दर 4 हजार 500 रूपयांनी घसरले आहेत. 

गेल्या आठवड्याचे चांदीचे दर
सोमवार             71 हजार 879 रूपये किलो
मंगळवार           71 हजार 248 रूपये किलो
बुधवार               71 हजार 468 रूपये किलो
गुरूवार             67 हजार 599 रूपये किलो
शुक्रवार             67 हजार 598 रूपये किलो