राज ठाकरेंनी शिवसेनाला दिला जोरदार दणका, त्यांची घरवापसी

शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारत राजकीय भूकंप घडवून आणला. मात्र, हा भूकंप क्षणिक ठरलाय. मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे.

Updated: Oct 25, 2017, 03:34 PM IST
राज ठाकरेंनी शिवसेनाला दिला जोरदार दणका, त्यांची घरवापसी title=

मुंबई : शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारत राजकीय भूकंप घडवून आणला. मात्र, हा भूकंप क्षणिक ठरलाय. मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे.

भाजपला शह देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक फोडले. मात्र, मनसेच्या चार नगरसेवकांची घरवापरसी होत आहे. यापैकी दोन नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यामुळे शिवसेनेचा बार फुसका निघाल्यात जमा आहे.

शिवसेनेत गेलेल्या ४ नगरसेवकांची पुन्हा मनसेत घरवापसी होण्याची चिन्ह आहेत. शिवाजी पार्क परिसरात यातील दोन नगरसेवक मनसे नेत्यांना भेटले. त्यावेळी या दोन नगरसेवकांनी राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केली. त्यामुळे शिवबंधन धागा बांधलेल्यापैकी दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे हे मनसेत पुन्हा दाखल होणार आहेत. यापैकीच दोन नगरसेवकांनी राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.