गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस

Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं.   

सायली पाटील | Updated: Aug 18, 2023, 08:47 AM IST
गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस title=
Ganeshotsav 2023 msrtc to run 550 special buses to Konkan from vasai virar

Kokan Ganpati Special ST Bus​: गणेशोत्सव आता महिन्याभरावर आला असून, अनेकांनीच गणरायाच्या आगमनासाठी मोठ्या लगबगीनं तयारीला सुरुवात केली आहे. शहरी भागांमध्ये मोठ्या मंडळांचे मंडपसी सजताना दिसत आहेत. असं असतानाच कोकणकर मात्र आता गावाकडे जायचा दिवस कधी एकदा उजाडतो याचीच वाट पाहत आहेत. कारण, शास्त्र असतं ते! 

गणेशोत्सव (Ganpati Festival 2023) म्हटलं की, कोकणात जाणारे चाकरमानी डोळ्यापुढं येतात. तुमच्याआमच्यापैकी अनेकजण याच गर्दीतला एक भाग. मोठ्या संख्येनं दरवर्षी नोकरीचाकरीसाठी शहरांमध्ये असणारे कोकणवासीय गावाची वाट धरतात. खासगी वाहन असो किंवा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय. गावाला जाण्यासाठी शक्य त्या माध्यमांची मदत ही मंडळी घेतात. अशाच सर्व कोकणकरांसाठी रेल्वे आणि राज्या परिवहन महामंडळानं पुढाकार घेत जादा रेल्वे आणि बस गाड्या सोडण्याच्या निर्णय घेतला आहे. 

कोणत्या मार्गावर असणार एसटीच्या विशेष गाड्या? 

दरवर्षीप्रमाणं यंदाची कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून तब्बल 550 जादा गाड्यांची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांनी गावाला जाण्याची तयारी आतापासूनच सुरु केली असून, 300 गाड्यांची तिकीटं फुल्ल झाली आहेत. त्यामुळं तुम्हालाही गावाला जायचं असेल तर, घाई करा आता फक्त 250 बसगाड्याच उरल्या आहेत. एसटी महामंडळाकडून वसई विरारमधून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा पुरवली जाणार आहे. पालघर महामंडळाच्या वतीनं या मार्गावर वसई, अर्नाळा, नालासोपारा आगारांमधून या गाड्यांसाठीची तिकीट बुकिंग सुरु केली आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा 

एसटीचं तिकीट मिळत नाहीये? 

गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याची तुमचीही धडपड सुरुये? तिकीटच मिळत नाहीये? एक बाब लक्षात घ्या की मुंबई-रत्नागिरी, मुंबई-सावंतवाडी, मुंबई-मालवणदरम्यान 16 आणि 17 सप्टेंबरला दर दिवशी 2*2 च्या सहा गाड्या सोडण्यात येणार आहेत. इथं महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत सवलती प्रवाशांना लागू असतील. या गाड्यांसाठी तिकीट हवं असल्यास डॉ. भडकमकर मार्ग शाखा, दोन हत्तीसमोर, वि. प. मार्ग, मुंबई-4 येथे संपर्क साधावा.