मुंबई : राज्यातील जनतेसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) मोठी घोषणा केली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. या पार्श्ववभूमीवर राज्य सरकराने कोकणात जाणाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. (ganeshotsav 2022 toll exemption for those going to konkan eknath shinde government give big decision)
गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्यांना भक्तांना यंदाही टोलमाफी मिळणारंय. मुंबई-बंगळुरु आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर टोल माफ करण्यात आला आहे.
ही टोलमाफी आजपासून म्हणजेच 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यासाठीचे पासेस आणि स्टिकर्स पोलीस विभागाकडे उपलब्ध आहेत.
गणेशोत्सव 2022 कोकण दर्शन अशा आशयाचे हे स्टिकर्स असतील. त्यावर पथकर माफी पास, वाहन क्रमांक, चालकाचं नाव लिहून ते स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस किंवा पोलिसांकडे द्यायचेत.
टोलमाफीसाठी भक्तांना पासेस घ्यावे लागणार. टोलनाक्यावर पासेस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी वाहनांची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर टोलपास मिळवता येईल.