Ganesh Visarjan 2022: गणेश विसर्जनासाठी कोणते रस्ते राहणार बंद? कुठे असतील वन वे? आताच जाणून घ्या

जर तुम्ही उद्या मुंबईत बाहेर पडण्याचा कोणता प्लॅन करत असाल तर वाहतूक मार्गातील बदल आधीच जाणून घ्या. 

Updated: Sep 8, 2022, 06:17 PM IST
Ganesh Visarjan 2022: गणेश विसर्जनासाठी कोणते रस्ते राहणार बंद? कुठे असतील वन वे? आताच जाणून घ्या title=

मुंबई: शुक्रवारी (09 सप्टेंबर, 2022) अनंत चतुर्दशी (Anand Chaturdashi Ganesh Visarjan ), म्हणजेच बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव (Ganesh Festival) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो आहे.

अशात मुंबईत गणेशोत्सवाचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. उद्या गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि विसर्जन मिरवणुकांनाही गालबोट लागू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. (traffic diversions in mumbai)  

(ganesh visarjan ) गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई यासारख्या महत्वाच्या विसर्जन ठिकाणी पोलिसांचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. 

गणेश विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रणासाठी याठिकाणी निरिक्षण मनोरे देखील उभारण्यात आले आहेत. 

या दरम्यान विसर्जन मार्गात वाहने बंद पडून विसर्जन मार्गात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून व्यवस्था करण्यात आल्या आहेत

  • एकूण 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत 
  • एकूण 54 ते एक दिशा मार्ग आहे आहेत 
  • एकूण 57 रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे
  • एकूण 184 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आली आहे

दरम्यान, नेमके कोणते रस्ते बंद राहतील, कुठे वन वे असणार आहे, जाणून घ्या खालील व्हिडिओंमधून : 

 

त्यामुळे, जर तुम्ही उद्या मुंबईत बाहेर पडण्याचा कोणता प्लॅन करत असाल तर वाहतूक मार्गातील बदल आधीच जाणून घ्या. 

ganesh visarjan 2022 traffic diversions and one way in mumbai data shared by mumbai police