राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन

मुख्यमंत्र्यांनी शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.

Updated: Aug 25, 2017, 08:47 PM IST
राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं आहे. श्रीगणेशाची 10 दिवसांसाठी स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी - सहकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
----------
नागपुरात नितीन गडकरींच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आलीय. गडकरी वाड्यात गणपतीच्या सरबराईची आणि आदरातिथ्याची लगबग आहे. गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली. 
--------------
राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंडे यांचे पती, मुलं, आई, बहीण यावेळी उपस्थित होते.  पंकजा मुंडे यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो. पाचही दिवस त्या घरी गणपतीची पूजा आणि त्याच्यासाठी नैवेद्य तयार करतात.
------------
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या ' सेवासदन ' या निवासस्थानी मिरवणूक काढत वाजतगाजत दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे आगमन झाले. मिरवणुकीत विनोद तावडे सहकुटुंब सहभाग झाले होते. विनोद तावडे यांनी ' ट्री गणेशा ' या संकल्पनेवर आधारित इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
-------------
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय. नारायण राणेंनी कुटुंबीयांसह गणपतीची पूजा केली. महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण करण्याची बुद्धी देवो असं सूचक विधान करत राणेंनी गणरायाला साकडं घातलं. तसंच राज्याला दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीपासून दूर ठेवण्याची प्रार्थनाही राणेंनी गणरायाला केली.