मुलीशी मैत्रीचे संबध म्हणजे शारीरिक संबंधास संमती नव्हे; न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

 मुलीने फक्त मैत्री केली म्हणून कोणत्याही मुलाला तिच्याशी शारीरिक संबध ठेवण्यास संमती आहे. हे समजू नये, किंवा अशी मैत्री मुलाला मुलीवर बळजबरी करण्याचा परवाना देत नाही. 

Updated: Jun 28, 2022, 11:44 AM IST
मुलीशी मैत्रीचे संबध म्हणजे शारीरिक संबंधास संमती नव्हे; न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा title=

मुंबई : मुलीने फक्त मैत्री केली म्हणून कोणत्याही मुलाला तिच्याशी शारीरिक संबध ठेवण्यास संमती आहे. हे समजू नये, किंवा अशी मैत्री मुलाला मुलीवर बळजबरी करण्याचा परवाना देत नाही. असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला गर्भवती करणाऱ्याला अटकपूर्व जामीन नाकाराला आहे.

हायकोर्टाने हा आदेश का दिला?
मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना असे निरीक्षण नोंदवले की, मुलीचे एका मुलाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने, मुलीच्या संमतीने त्या मुलाला शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे. वास्तविक, एका आरोपीने तरुणीशी मैत्री केली, त्यानंतर लग्नाच्या आमिषाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदर राहिली. या प्रकरणी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता.

काय होती महिलेची तक्रार

तरुणीच्या तक्रारीनुसार, तिची आरोपीसोबत मैत्री होती. आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवले. नंतर ती गरोदर राहिल्यानंतर तिने लग्नास नकार दिला.

काय म्हणाले आरोपी?

कोर्टात आरोपीच्या वतीने सांगण्यात आले की, तरुणीने तिच्या संमतीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी आरोपीची कोठडी वाढवण्यात आली आहे.